Sunday, April 5, 2026

येतोय "देऊळ बंद २"


शंकर मराठे - मुंबई, ६ एप्रिल २०२६ : २०१५ साली प्रदर्शित झालेल्या "देऊळ बंद" चित्रपटाला प्रेक्षकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. अध्यात्म व विज्ञान यांची सांगड घालणारा, किंबहूना विज्ञानाचा आत्मा हा अध्यात्म आहे हे अधोरेखित करणाऱ्या तसेच श्री स्वामी समर्थ महाराज आणि वैज्ञानिक यांच्या भोवती फिरणाऱ्या कथेने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली त्यामुळे आजही "देऊळ बंद" आवर्जून बघितला जातो. "देऊळ बंद"चा अजून एक भाग यावा अशी इच्छा अनेक प्रेक्षकांनी व्यक्त केली होती आणि या इच्छेचा मान राखत लेखक, दिग्दर्शक प्रविण विठ्ठल तरडे यांनी "देऊळ बंद २" ची घोषणा केली होती. वटवृक्ष एंटरटेनमेंट निर्मित "देऊळ बंद २" चे डिजिटल पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले आणि चित्रपट २१ मे २०२६ रोजी जगभरात प्रदर्शित होणार असल्याचे जाहीर झाले.

No comments:

Post a Comment

स्वामीचा "देऊळ बंद २" मध्ये दुचाकीवरून प्रवास

शंकर मराठे - मुंबई, १६ एप्रिल २०२६ : बहुप्रतिक्षित "देऊळ बंद २" च्या प्रदर्शनाची २१ मे २०२६ ही तारीख गेल्या आठवड्यात जाहीर करण्यात...