शंकर मराठे - मुंबई, ६ एप्रिल २०२६ : देवमाणूस - मधला अध्याय' या झी मराठीवरील मालिकेत अभिनेत्री सोनम म्हसवेकर 'लाली' ही महत्त्वाची भूमिका साकारत आहे. गोपाळची (किरण गायकवाड) पत्नी म्हणून ती मालिकेत असून, ती गोपाळच्या डावांना उधळून लावणारी आणि अनेक खून करणारी एक धाडसी व भयंकर नायिका म्हणून लोकप्रिय झाली आहे.
लाली हे पात्र साधीभोळी नसून, ती 'फायर' आहे आणि गोपाळच्या डोळ्यात धूळ फेकते. गोपाळच्या प्रेमाची जाणीव करून देण्यासाठी ती आकाश-पाताळ एक करते, तरीही ती गोपाळच्या चुकीच्या कामांना चोख प्रत्युत्तर देते.
सध्या चालू असलेल्या मालिकेच्या कथानकानूसार लालीचा नवा ग्लॅमरस लूक पहायला मिळत आहे व लाली देवमाणूस वर म्हणजे गोपाळ वर भारी पडताना दिसत आहे.
दैवमाणूस मधला अध्याय मालिका झी मराठीवर दररोज रात्री १० वाजता प्रसारित होते.

No comments:
Post a Comment