Monday, April 6, 2026

गोड गळ्याची गायिका प्राध्यापिकेच्या भूमिकेत


शंकर मराठे - मुंबई, ६ एप्रिल २०२६ : सारेगमप लिटल चॅम्प्स या गाजलेल्या शोमधून घराघरात पोहोचलेली आणि त्यानंतर ती सध्या काय करते या सुपरहिट चित्रपटातून अभिनयाची चुणूक दाखवणारी आर्या आंबेकर आता थेट मालिका विश्वात पाऊल ठेवत आहे. झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय कमळी या मालिकेत ती अनामिका गाडगीळ हे पात्र साकारत आहे.

आता अनामिकाच्या प्रवेशामुळे कथानकात एक रंजक वळण येणार आहे. ही अनामिका थेट ऋषीच्या आयुष्यात येणार आहे. तिच्या या सकारात्मक एन्ट्रीमुळे ऋषीला कमळी बद्दलच्या प्रेमाची जाणीव होणार की कथानक काहीतरी वेगळे वळण घेणार, हे पाहणे अतिशय उत्सुकतेचे ठरणार आहे. आर्याच्या एन्ट्रीचा हा विशेष भाग ८ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता झी मराठी वाहिनीवर प्रसारित होईल. 

No comments:

Post a Comment

स्वामीचा "देऊळ बंद २" मध्ये दुचाकीवरून प्रवास

शंकर मराठे - मुंबई, १६ एप्रिल २०२६ : बहुप्रतिक्षित "देऊळ बंद २" च्या प्रदर्शनाची २१ मे २०२६ ही तारीख गेल्या आठवड्यात जाहीर करण्यात...