शंकर मराठे - मुंबई, २७ एप्रिल २०२६ : १९६०च्या दशकातली मुंबई... रात्र झाली की शहर झोपायचं नाही, तर थरथरायचं ! गिरण्यांचे भोंगे, कष्टकरी कामगारांचा घाम... आणि त्या अंधारात एक नाव - रतन खत्री.
ना बंदूक, ना गँग... तरीही लाखो लोकांच्या नशिबावर राज्य करणारा "मटका किंग"! कराचीपासून मुंबईपर्यंतचा संघर्ष, भारताच्या फाळणी नंतरचं आयुष्य, आणि आकड्यांच्या जोरावर उभं केलेलं कोट्यवधींचं साम्राज्य ! "मटका" एक साधा पण विश्वासावर चालणारा गेम... इराणी कॅफेमध्ये लाईव्ह आकडे, टेलिफोन नेटवर्कवर चालणारी समांतर अर्थव्यवस्था ! पण मग आला टर्निंग पॉइंट - भारतातील ईमरजन्सी, आणि पुढे अंडरवर्ल्डची एंट्री दाऊद इब्राहिम आणि अरूण गवळी. शेवटी राजकारणी की जीनियस ? ही आहे नागराज मंजुळे दिग्दर्शित वेब सीरिज मटका किंगची मूळ कथा....

No comments:
Post a Comment