शंकर मराठे - मुंबई, १ मे २०२६ : 'राजा शिवाजी' हा चित्रपट १ मे २०२६ रोजी, महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाला असून यातील एका खास एन्ट्रीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानने या चित्रपटात शिवरायांचे निष्ठावान मावळे 'जिवा महाला' यांच्या भूमिकेत दमदार कॅमिओ केला आहे.
गेल्या काही महिन्यांपासून सलमान खानच्या या चित्रपटातील भूमिकेबाबत प्रचंड गुप्तता पाळण्यात आली होती. 'बिग बॉस मराठी ६' च्या ग्रँड फिनालेमध्ये रितेशने याबाबतची पहिली घोषणा केली होती. आता चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर सलमानचा पडद्यावरील अंदाज पाहून प्रेक्षक भारावून गेले आहेत. भगव्या रंगाचा फेटा आणि कुर्ता, हातात तळपती तलवार अशा दमदार लूकमध्ये सलमानने चाहत्यांची मने जिंकली आहेत. शत्रूच्या मानेवर तलवार रोखून जेव्हा सलमान म्हणतो, "शिवाजी नाही, शिवाजी राजं म्हणायचं..", तेव्हा चित्रपटगृहात एकच जल्लोष होतो.

No comments:
Post a Comment