शंकर मराठे - मुंबई, ३० एप्रिल २०२६ : रितेश देशमुख दिग्दर्शित आणि अभिनित 'राजा शिवाजी' या बहुचर्चित चित्रपटाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटात बॉलिवूडचा 'सल्लू मियां' म्हणजेच सलमान खान एका खास आणि ऐतिहासिक भूमिकेत दिसणार आहे, यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे.
सलमानच्या सहभागाबद्दल बोलताना रितेश म्हणाला, "मी सलमान खानकडे या चित्रपटासाठी गेलो नव्हतो, पण न्यू इयरला जेव्हा आम्ही एकत्र होतो तेव्हा त्यांनीच मला विचारलं की सिनेमात माझा रोल कोणता आहे. तेव्हा मी काहीच बोललो नाही, त्यावेळी ते हक्काने म्हणाले की माझ्याशिवाय तुम्ही हा चित्रपट करुच शकत नाही, मी यात असलोच पाहिजे. त्यांची ही आपुलकी पाहून मी भारावून गेलो आणि आता सलमान 'राजा शिवाजी' चित्रपटात एका खास भूमिकेत दिसणार आहे."
आता सलमान खानच्या एन्ट्रीमुळे चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहोचली असून, १ मे २०२६ रोजी चित्रपटगृहात हा ऐतिहासिक सोहळा अनुभवण्यासाठी प्रेक्षक आतुर झाले आहेत.

No comments:
Post a Comment