Wednesday, April 29, 2026

७ भाषांमध्ये व्हिज्युअल डब सिनेमा 'गोंधळ'


शंकर मराठे - मुंबई, २९ एप्रिल २०२६ : मराठी चित्रपटसृष्टीला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळवून देणारा ‘गोंधळ’ या चित्रपटाने आता जागतिक झेप घेतली आहे. ‘गोंधळ’ तब्बल ७ भाषांमध्ये डब झाला असून, व्हिज्युअल डब या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने तो मराठीसह तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम, हिंदी आणि इंग्रजी या भाषांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अशा प्रकारे सादर होणारा हा पहिलाच भारतीय चित्रपट ठरत आहे.

महाराष्ट्राची प्राचीन संस्कृती, समृद्ध परंपरा आणि ‘गोंधळ’च्या कथानकातील थरार जगभरातील प्रेक्षकांना अनुभवता यावा, तसेच ही लोकसंस्कृती जतन व्हावी, या उद्देशानेच आम्ही हा चित्रपट विविध भाषांमध्ये सादर करण्याचा प्रयत्न केला आहे. 

No comments:

Post a Comment

७ भाषांमध्ये व्हिज्युअल डब सिनेमा 'गोंधळ'

शंकर मराठे - मुंबई, २९ एप्रिल २०२६ : मराठी चित्रपटसृष्टीला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळवून देणारा ‘गोंधळ’ या चित्रपटाने आता जागतिक झेप घेतली आ...