शंकर मराठे - मुंबई, ९ मे २०२६ : गायिका आशा भोसले यांच्या आवाजातील प्रसिद्ध गाण्याच्या शूटिंग दरम्यान मुमताज यांना तब्बल ४ मिनिटं सतत थंडगार धबधब्याखाली भिजत शूटिंग करावं लागलं होतं. त्या काळात शूटिंगसाठी ना गरम पाण्याची व्यवस्था होती, ना आधुनिक सुविधा. तरीही त्यांनी कोणतीही तक्रार न करता पूर्ण समर्पणाने शूटिंग पूर्ण केलं.
त्या वेळची थंडी आणि सतत पडणारं पाणी यामुळे परिस्थिती खूप कठीण झाली होती. मात्र दिग्दर्शकाला हवा असलेला परफेक्ट शॉट मिळावा यासाठी मुमताज यांनी स्वतःला पूर्णपणे त्या सीनमध्ये झोकून दिलं. त्यांच्या या मेहनतीमुळेच ते गाणं पुढे प्रचंड लोकप्रिय ठरलं आणि हे गाणं होतं - आज कोई प्यार से दिल की बात कह गया. त्याचबरोबर हे गाणं १९६६ सालच्या सावन की घटा ह्या सिनेमातील होतं.
विशेष म्हणजे, त्या काळातील कलाकार अभिनयाला केवळ ग्लॅमर नव्हे तर एक जबाबदारी मानायचे. त्यामुळेच जुन्या हिंदी चित्रपटांतील गाणी आणि दृश्यं आजही लोकांच्या मनात तितकीच ताजी आहेत.


No comments:
Post a Comment