Monday, May 11, 2026

कसे पुसले गेले ह्या अभिनेत्रीचे रुपेरी पडद्यावरील अस्तित्व ?


शंकर मराठे - मुंबई, १२ मे २०२६ : हिंदी चित्रपटसृष्टीत साठ आणि ऐंशीच्या दशकात आपल्या सौंदर्याची आणि उत्तम अभिनयाची भुरळ घालणारी एक अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे माला सिन्हा. सर्वाधिक मानधन घेणाऱ्या या अभिनेत्रीच्या आयुष्यात एका चुकीमुळे मोठे वादळ आले आणि तिचे रुपेरी पडद्यावरील अस्तित्वच पुसले गेले.

अभिनेत्री माला सिन्हाने शम्मी कपूर यांच्यासोबत रंगीन रातें या चित्रपटातून तिने धमाकेदार पदार्पण केले. पुढे तिने देव आनंद, धर्मेंद्र, राजेश खन्ना, अमिताभ बच्चन आणि मनोज कुमार यांसारख्या मोठ्या स्टार्ससोबत अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले. यामध्ये प्यासा, धूल के फूल, उजाला, अनपढ़ आणि हरियाली और रास्ता यांसारख्या सुपरहिट सिनेमाचा समावेश होता.

शिखरावर असताना १९७८ मध्ये घडलेल्या एका प्रसंगामुळे सर्व काही बदलले. इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांनी तिच्या घरावर अचानक छापा टाकला. या तपासादरम्यान अधिकाऱ्यांना चक्क बाथरूमच्या भिंतीमध्ये लपवलेले तब्बल १२ लाख रुपये सापडले. सुरुवातीला तिने हे घबाड आपल्या वडिलांनी लपवून ठेवल्याचे कारण पुढे केले. परंतु नंतर न्यायालयीन प्रक्रियेत हा पैसा आपण वेश्याव्यवसाय करून मिळवला असल्याची धक्कादायक कबुली तिने दिली. पैशांवरील हक्क गमावू नये म्हणून दिलेले हे एक विधान तिच्यासाठी आत्मघातकी ठरले.

कायद्यानुसार तिला ते पैसे स्वतःकडे ठेवण्याची परवानगी मिळाली खरी पण तिच्या या वादग्रस्त खुलाशामुळे संपूर्ण चित्रपटसृष्टीत भूकंप आला. परिणामी तिच्या हातातील मोठे चित्रपट निसटले आणि तिला नाइलाजाने सिनेसृष्टीला कायमचा रामराम ठोकावा लागला.

No comments:

Post a Comment

कल्पना पटवारी की ७ गीतों की ‘छठ गीतमाला’

शंकर मराठे - मुंबई, ६ नवंबर, २०२६ : छठ महापर्व के अवसर पर लोकगायिका कल्पना पटवारी ७ छठगीतों की विशेष ‘छठ गीतमाला’ लेकर आ रही हैं। इस संगीतमय...