शंकर मराठे - मुंबई, १८ मे २०२६ : ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी फ्रान्समध्ये सुरू असलेल्या ७९ व्या 'कान्स फिल्म फेस्टिव्हल' २०२६ च्या रेड कार्पेटवर दिमाखात हजेरी लावली. 'अभिजात मराठी' या ओटीटी प्लॅटफॉर्मच्या जागतिक लॉंचसाठी ते कान्समध्ये पोहोचले होते, जिथे त्यांनी आपल्या मराठमोळ्या आणि पारंपरिक अंदाजाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
अशोक सराफ यांनी पांढऱ्या रंगाचा सूट आणि काळ्या रंगाची पँट असा अत्यंत आकर्षक व भारदस्त पोशाख परिधान केला होता. रेड कार्पेटवर आल्यावर त्यांनी हात जोडून सर्वांना अभिवादन केले, ज्याचे चाहत्यांनी प्रचंड कौतुक केले.

No comments:
Post a Comment