Wednesday, May 20, 2026

'राजा शिवाजी' ने 'सैराट'चा विक्रम मोडला


शंकर मराठे - मुंबई, २१ मे २०२६ : रितेश देशमुख स्टारर 'राजा शिवाजी' या ऐतिहासिक चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घालत प्रदर्शनाच्या तिसऱ्या आठवड्यात या सिनेमाने जगभरात तब्बल ११४.८ कोटींहून अधिक रुपयांची विक्रमी कमाई केली आहे. या जबरदस्त यशासोबतच सिनेमा 'सैराट'चा विक्रम मोडीत काढत 'राजा शिवाजी' हा मराठी चित्रपटसृष्टीतील आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.

प्राथमिक अहवालानुसार, अठराव्या दिवशी म्हणजेच तिसऱ्या सोमवारी चित्रपटाने १.१५ कोटी रुपये कमावले आहेत.या सातत्यपूर्ण कमाईमुळे भारतातील एकूण नेट कलेक्शन आता ९४.२५ कोटी रुपयांवर पोहोचले आहे.

१० वर्षांपूर्वी म्हणजेच २०१६ साली 'सैराट' या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीत १०० कोटींचा टप्पा ओलांडून एक ऐतिहासिक विक्रम प्रस्थापित केला होता. आता तब्बल दशकानंतर 'राजा शिवाजी' या महाकाव्याने तो विक्रम मोडीत काढला आहे. निर्मात्यांनी दिलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, या चित्रपटाने जगभरात ११४.८ कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे. यामुळे 'राजा शिवाजी' आता मराठी मनोरंजन विश्वातील सर्वाधिक कमाई करणारा आणि सर्वांत मोठा चित्रपट बनण्याचा मान मिळवला आहे.


No comments:

Post a Comment

कल्पना पटवारी की ७ गीतों की ‘छठ गीतमाला’

शंकर मराठे - मुंबई, ६ नवंबर, २०२६ : छठ महापर्व के अवसर पर लोकगायिका कल्पना पटवारी ७ छठगीतों की विशेष ‘छठ गीतमाला’ लेकर आ रही हैं। इस संगीतमय...