Monday, May 25, 2026

साडी नेसून गाणं गाणारा सुपरस्टार


शंकर मराठे - मुंबई, २६ मे २०२६ : बॉलीवूडच्या दुनियेत १९८१ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'लावारिस' या चित्रपटामध्ये चक्क एका गाण्यासाठी अमिताभ बच्चन यांनी साडी नेसून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. 'लावारिस' या चित्रपटातील 'मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है' हे गाणे त्या काळामध्ये प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाले होते. या विशेष गाण्यासाठी अमिताभ बच्चन यांनी साडी नेसून अत्यंत उत्तम असा डान्स केला होता. विशेष आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी केवळ या गाण्यावर डान्सच केला नाही, तर हे संपूर्ण गाणे स्वतःच्या आवाजात गायले देखील होते. त्यांचे हे वेगळे रूप आणि गाणं प्रेक्षकांना प्रचंड आवडले होते.


No comments:

Post a Comment

कल्पना पटवारी की ७ गीतों की ‘छठ गीतमाला’

शंकर मराठे - मुंबई, ६ नवंबर, २०२६ : छठ महापर्व के अवसर पर लोकगायिका कल्पना पटवारी ७ छठगीतों की विशेष ‘छठ गीतमाला’ लेकर आ रही हैं। इस संगीतमय...