Thursday, May 7, 2026

स्वामींची परीक्षा शेतकरी महिला घेणार


शंकर मराठे - मुंबई, ८ मे २०२६ : "देऊळ बंद २ - आता परीक्षा देवाची" च्या टीझरमघ्ये आस्तिक शेतकऱ्याची नास्तिक पत्नी असणाऱ्या स्नेहल तरडे उद्विग्न अवस्थेत आपला नवरा देऊळ बंद करून चावी घेऊन कुठेतरी निघून गेला असल्याची तक्रार घेऊन स्वामींना बोलाविण्यासाठी अत्यंत रागाने वारुळावर दगड मारते आणि स्वामी प्रकट होतात कारण भक्ताने मनापासून बोलावले की देव येतोच. त्यानंतर स्वामींचा विविध वाहनातून प्रवास दाखवताना काही दिग्गज कलाकारांची झलक पाहायला मिळते. पुढच्या प्रसंगात स्वामी म्हणतात "अगं ए नास्तिके प्रत्येक युगात तुझ्या सारखे कित्येक रावण आणि कित्येक दुर्योधन पाहिलेत मी देवाची परीक्षा पाहणारे"  त्यावर शेतकरी महिला म्हणते "लिहून देते, कधी शेतकरी नसल पाहिला." त्यांच्या या संवादावरून "देऊळ बंद २" मध्ये आपल्या कुटुंबासाठी आणि समाजासाठी एक गरीब शेतकरी महिला देवाची सुद्धा परीक्षा घेऊ शकते हे स्पष्ट होत आहे. 

शेवटच्या प्रसंगात स्नेहल तरडे स्वामींना परत जायला सांगतात पण तू परीक्षेला बसवलं आहे ना? त्यामुळे परीक्षा दिल्या शिवाय मी जाणार नाही... आता परीक्षा देवाची असे म्हणत स्वामी जायला नकार देतात. नदीकाठचा निसर्गरम्य परिसर, भव्य वडाचे झाड आणि एका बाजूला स्वामींची जरब तर दुसऱ्या बाजूला एका सामान्य स्त्रीचे धैर्य, असा हा सामना खिळवून ठेवणारा आहे. आता या परीक्षेत स्वामी कोणत्या प्रश्नांना समोरे जाणार आणि शेतकऱ्यांच्या कोणत्या समस्यांचे निवारण करणार? हे बघण्यासाठी प्रेक्षकांना २१ मे पर्यंत वाट बघावी लागणार आहे.

No comments:

Post a Comment

कल्पना पटवारी की ७ गीतों की ‘छठ गीतमाला’

शंकर मराठे - मुंबई, ६ नवंबर, २०२६ : छठ महापर्व के अवसर पर लोकगायिका कल्पना पटवारी ७ छठगीतों की विशेष ‘छठ गीतमाला’ लेकर आ रही हैं। इस संगीतमय...