शंकर मराठे - मुंबई, १ जून २०२६ : येत्या ५ जून रोजी रिलीज होणाऱ्या तुंबाडची मंजुळा या चित्रपटामधील अभिनेता मकरंद अनासपुरेंच्या नव्या लूकने सध्या सर्वत्र मोठी उत्सुकता निर्माण केली आहे. आपल्या सहजसुंदर अभिनयाने आणि अफाट विनोदी शैलीने महाराष्ट्राला खळखळून हसवणारे लोकप्रिय अभिनेते मकरंद अनासपुरे एका अतिशय वेगळ्या आणि आश्चर्यकारक रूपातून प्रेक्षकांसमोर येणार आहेत.
हया चित्रपटात मकरंद अनासपुरे एका वेगळ्याच धाटणीच्या म्हणजेच भोंदू महाराज या व्यक्तिरेखेत दिसणार आहेत. चेहऱ्यावर भरगच्च दाढी, डोक्यावर लांबसडक केस, कपाळावर लक्ष वेधून घेणारा मोठा टिळा, गळ्यात रुद्राक्षांच्या माळा आणि पारंपरिक साधूचा वेश असा त्यांचा हा अवतार आहे. हा वेश जरी एका गंभीर साधूचा असला, तरी त्यांच्या नेहमीच्या खुमासदार आणि मिश्किल अभिनयाची चुणूक टीझरमधून स्पष्ट दिसते. त्यांची अचूक देहबोली आणि अफलातून हावभाव यामुळे या भूमिकेला एक कमालीची रंगत प्राप्त झाली आहे.

No comments:
Post a Comment