शंकर मराठे - मुंबई, १६ जून २०२६ : महाराष्ट्राचा खरा अभिमान असणाऱ्या व लोककलेचा वारसा जागतिक पातळीवर पोहोचवणाऱ्या ‘तमाशा सम्राज्ञी’ स्व. विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनप्रवासावर आधारित ‘ईठा’ या चित्रपटाचे अधिकृत पोस्टर प्रदर्शित झाले आहे.
कलेवरील निष्ठा काय असावी, याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे विठाबाई. पोटात नऊ महिन्यांचं बाळ असतानाही त्यांनी रंगमंच सोडला नाही आणि त्याच रंगमंचावर कलाकृती सादर करत असताना, आपल्या बाळाला जन्म दिला. नाळ कापून, बाळ बाजूला ठेवून त्या पुन्हा प्रेक्षकांसमोर कला सादर करण्यासाठी उभ्या राहिल्या. येत्या २८ ऑगस्टपासून हा भव्य चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

No comments:
Post a Comment