Wednesday, June 24, 2026

प्रार्थना बेहेरेचा रौद्र अवतार चर्चेत


शंकर मराठे - मुंबई, २४ जून २०२६ : "ज्याला आई मारी त्याला कोण तारी!..."  अभिनेत्री प्रार्थना बेहेरे हिच्या प्रमुख भूमिकेतील ‘मर्दिनी’ या चित्रपटाचा बहुप्रतिक्षित ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. प्रार्थनाचा कधीही न पाहिलेला रौद्र अवतार सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

ट्रेलरमध्ये सुरुवातीला साधी, भोळी आणि अगदी झुरळालाही घाबरणारी महिला दाखवली आहे. मात्र, जेव्हा तिच्या लेकीवर संकट येते, तेव्हा तीच आई ‘मर्दिनी’ बनते. “आई लेकरासाठी ज्योतही पेटवते आणि राक्षसांसाठी चिताही...” हा संवाद ट्रेलरची खासियत ठरतो.

आईच्या प्रेमाची ताकद, तिची जिद्द आणि नारीशक्तीचा थरारक प्रवास दाखवणारा ‘मर्दिनी’ प्रेक्षकांना भावनिक अनुभव देणार, यात शंका नाही. हा चित्रपट ३ जुलै २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे.

No comments:

Post a Comment

कल्पना पटवारी की ७ गीतों की ‘छठ गीतमाला’

शंकर मराठे - मुंबई, ६ नवंबर, २०२६ : छठ महापर्व के अवसर पर लोकगायिका कल्पना पटवारी ७ छठगीतों की विशेष ‘छठ गीतमाला’ लेकर आ रही हैं। इस संगीतमय...