Wednesday, June 24, 2026

श्रद्धा कपूरचा 'ईठा' या चित्रपटाच्या नावावरून वाद


शंकर मराठे - मुंबई, २४ जून २०२६ : लावणीसम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या अफाट जीवनसंघर्षावर आधारित आगामी बायोपिक 'ईठा' या चित्रपटाच्या नावावरून आता नवा वाद उफाळून आला आहे. अभिनेत्री श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत असलेल्या या चित्रपटाच्या शीर्षकावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या चित्रपट आणि सांस्कृतिक विभागाने तीव्र आक्षेप नोंदवला आहे. या महान लोककलावंताचा योग्य सन्मान राखण्यासाठी चित्रपटाचे नाव बदलून 'विठाबाई' किंवा 'विठा' असे ठेवण्यात यावे, अशी आक्रमक मागणी पक्षाकडून करण्यात आली आहे.

नुकताच या चित्रपटाचा टीझरही समोर आला आहे. मात्र, या चित्रपटाच्या 'ईठा' या नावावर राष्ट्रवादी चित्रपट आणि सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी कडाडून विरोध दर्शवला आहे आणि चित्रपट निर्मात्यांना याबाबतचे निवेदन दिले आहे.

बाबासाहेब पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना म्हटले आहे की, "ज्या महान कलाकाराच्या त्याग, जीवनसंघर्ष आणि कर्तृत्वावर हा चित्रपट आधारित आहे, त्या थोर कलाकाराचे नाव 'विठाबाई नारायणगावकर' आहे. त्यामुळे चित्रपटाच्या शीर्षकातूनच त्यांच्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचा आणि लोककलेतील अमूल्य योगदानाचा सन्मान व्यक्त होणे आवश्यक आहे." त्यांच्या मते, 'ईठा' या नावामुळे त्यांच्या नावाचा आणि कार्याचा योग्य तो आदर राखला जात नसल्याची भावना निर्माण होत आहे. म्हणूनच, निर्मात्यांनी चित्रपटाच्या नावात त्वरित बदल करून ते 'विठाबाई' किंवा 'विठा' असे करावे. यातूनच त्यांच्या वारशाचे खऱ्या अर्थाने जतन होईल.


No comments:

Post a Comment

कल्पना पटवारी की ७ गीतों की ‘छठ गीतमाला’

शंकर मराठे - मुंबई, ६ नवंबर, २०२६ : छठ महापर्व के अवसर पर लोकगायिका कल्पना पटवारी ७ छठगीतों की विशेष ‘छठ गीतमाला’ लेकर आ रही हैं। इस संगीतमय...