Tuesday, June 16, 2026

सस्पेन्स-थरारक सिनेमा ‘बोल बोल राणी’ प्रदर्शित होण्यास सज्ज

 


शंकर मराठे - मुंबई, १७ जून २०२६ : मराठी चित्रपटसृष्टीत सध्या नवनवीन प्रयोग होत आहेत. त्यातच आता प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा एक उत्कठांवर्धक, थ्रिलर आणि सस्पेन्सने परिपूर्ण असा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘न्यूझीलंड मोशन पिक्चर्स लिमिटेड’ निर्मित, सई ताम्हणकर, सुबोध भावे, चिन्मय मांडलेकर व संभाजी ससाणे यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘बोल बोल राणी’ हा चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. नुकतीच टीझरच्या माध्यमातून या चित्रपटाची पहिली थरारक झलक समोर आली असून, यामुळे सिनेप्रेक्षकांमध्ये चित्रपटाविषयीची उत्सुकता कमालीची वाढली आहे.

'बोल बोल राणी' हा एक आगामी बहुचर्चित मराठी सस्पेन्स-थ्रिलर चित्रपट आहे, जो १० जुलै रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. 

No comments:

Post a Comment

कल्पना पटवारी की ७ गीतों की ‘छठ गीतमाला’

शंकर मराठे - मुंबई, ६ नवंबर, २०२६ : छठ महापर्व के अवसर पर लोकगायिका कल्पना पटवारी ७ छठगीतों की विशेष ‘छठ गीतमाला’ लेकर आ रही हैं। इस संगीतमय...