शंकर मराठे - मुंबई, १० जून २०२६ : मुंबईत अद्याप पावसाचे आगमन झाले नसले, तरी अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या 'लालबागच्या राजाच्या' आगमनाची चाहूल लागली आहे. याच पार्श्वभूमीवर आज पहाटे लालबागच्या मार्केट येथील हनुमान मंदिरात राजाचे विधिवत पाऊल पूजन करण्याचा कार्यक्रम संपन्न झाला. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष्यांच्या हस्ते हा पवित्र पूजाविधी पार पडला. या पाऊल पूजनानंतर आजपासूनच प्रसिद्ध मूर्तीकार 'कांबळी बंधू' यांच्या कार्यशाळेत लालबागच्या राजाची भव्य आणि देखणी मूर्ती घडवण्याच्या कामाला रीतसर सुरुवात झाली आहे. या धार्मिक सोहळ्यामुळे जगभरातील कोट्यवधी गणेशभक्तांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून, मुंबईत खऱ्या अर्थाने गणेशोत्सवाचे नगारे वाजायला सुरुवात झाली आहे.
Wednesday, June 10, 2026
लालबागच्या राजाची मूर्ती घडविण्याचे काम सुरू

Subscribe to:
Post Comments (Atom)
कल्पना पटवारी की ७ गीतों की ‘छठ गीतमाला’
शंकर मराठे - मुंबई, ६ नवंबर, २०२६ : छठ महापर्व के अवसर पर लोकगायिका कल्पना पटवारी ७ छठगीतों की विशेष ‘छठ गीतमाला’ लेकर आ रही हैं। इस संगीतमय...
-
शंकर मराठे - मुंबई, १९ दिसंबर २०२५ : बिहार की राजधानी में रंगमंच की विधा को नई ऊंचाइयों पर ले जाते हुए नाट्य संस्था 'दस्तक' द्वारा...
-
शंकर मराठे - मुंबई, १८ डिसेंबर २०२५ : मराठी प्रेक्षकांच्या उत्सुकतेचा विषय ठरलेला ‘अगं अगं सुनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ हा चित्रपट येत्या न...
-
शंकर मराठे - मुंबई, १९ दिसंबर २०२५ : फिल्म बजरंगी भाईजान में मुन्नी बनकर देशभर का दिल जीतने वाली हर्षाली मल्होत्रा एक बार फिर सुर्खियों में ...

No comments:
Post a Comment