Sunday, July 26, 2026

रामायण सिनेमात हा मराठी अभिनेता साकारणार महर्षी विश्वामित्र


शंकर मराठे - मुंबई, २६ जुलै २०२६ : बॉलिवूडचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या बहुचर्चित रामायण पार्ट १ हया महाकाव्यावर आधारित भव्य सिनेमात आता आणखी एका मराठमोळ्या अभिनेत्याची दमदार एन्ट्री झाली आहे. अभिनेता अजिंक्य देव हया चित्रपटात महर्षी विश्वामित्र यांच्या रुपात पाहायला मिळतील. प्रभू श्रीराम यांच्या जीवनात आणि संपूर्ण रामायण या महाकाव्यात महर्षी विश्वामित्र यांचे स्थान अत्यंत मोलाचे आहे. ते केवळ श्रीराम व लक्ष्मण यांचे मार्गदर्शक गुरु नव्हते, तर त्यांनीच राम-लक्ष्मणाला विविध दिव्य अस्त्रांचे ज्ञान दिले होते. एवढेच नाही तर, राक्षसी ताडकावध करण्याच्या भीषण संकटाच्या वेळी त्यांनीच योग्य मार्गदर्शन केले. तसेच, याच महर्षींनी दोघा भावांना मिथिला नगरी येथे नेले, ज्यामुळे ऐतिहासिक सीतास्वयंवर आणि विवाहाचा सुकर मार्ग मोकळा झाला होता. त्यामुळे, अजिंक्य देव यांच्यासारख्या अनुभवी अभिनेत्याकडून या महान पात्राला नक्कीच योग्य न्याय मिळेल, अशी अपेक्षा आहे.


No comments:

Post a Comment

कल्पना पटवारी की ७ गीतों की ‘छठ गीतमाला’

शंकर मराठे - मुंबई, ६ नवंबर, २०२६ : छठ महापर्व के अवसर पर लोकगायिका कल्पना पटवारी ७ छठगीतों की विशेष ‘छठ गीतमाला’ लेकर आ रही हैं। इस संगीतमय...