Saturday, July 25, 2026

पीआरसीआय मुंबईकडून विजयेंद्र भावसार यांना जनसंपर्क उत्कृष्टता पुरस्काराने गौरव


शंकर मराठे - मुंबई, २५ जुलै २०२६  : अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेडच्या कॉर्पोरेट कम्युनिकेशन्स विभागात कार्यरत असलेले विजयेंद्र भावसार यांना इंटरनॅशनल पीआर डे २०२६ निमित्त पब्लिक रिलेशन्स कौन्सिल ऑफ इंडिया (PRCI), मुंबई चॅप्टर तर्फे 'पब्लिक रिलेशन्स एक्सलन्स रिकग्निशन' प्रदान करून जनसंपर्क आणि कॉर्पोरेट कम्युनिकेशन्स क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल गौरविण्यात आले.

जनसंपर्क आणि कॉर्पोरेट कम्युनिकेशन्स क्षेत्रातील २५ वर्षांहून अधिक अनुभव असलेल्या भावसार यांनी वीज, पायाभूत सुविधा, दूरसंचार, बँकिंग, एफएमसीजी, रिटेल, हॉस्पिटॅलिटी, शिक्षण आणि तंत्रज्ञान अशा विविध क्षेत्रांमध्ये काम केले आहे. सध्या ते अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेडमध्ये कॉर्पोरेट कम्युनिकेशन्स उपक्रमांचे नेतृत्व करत असून, पारदर्शक आणि प्रभावी संवादाच्या माध्यमातून भागधारकांशी विश्वासपूर्ण संबंध निर्माण करणे आणि संस्थेची प्रतिमा अधिक बळकट करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.

हा सन्मान प्रदान केल्याबद्दल भावसार यांनी पीआरसीआय मुंबई चॅप्टरचे मनःपूर्वक आभार मानले. तसेच सहकारी, मार्गदर्शक, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी, उद्योग क्षेत्रातील सहकारी आणि कुटुंबीय यांच्या सातत्यपूर्ण पाठिंब्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. हा सन्मान भविष्यातही जनसंपर्क क्षेत्रात सातत्याने शिकत राहून, नाविन्यपूर्ण कार्य करत अधिक योगदान देण्यासाठी प्रेरणादायी ठरेल, असे त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

कल्पना पटवारी की ७ गीतों की ‘छठ गीतमाला’

शंकर मराठे - मुंबई, ६ नवंबर, २०२६ : छठ महापर्व के अवसर पर लोकगायिका कल्पना पटवारी ७ छठगीतों की विशेष ‘छठ गीतमाला’ लेकर आ रही हैं। इस संगीतमय...