शंकर मराठे - मुंबई, २५ जुलै २०२६ : कर्तव्यनिष्ठ अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या कार्याची चर्चा आता आणखी व्यापक पातळीवर होताना दिसत आहे. नुकतीच बॉलिवूड अभिनेते श्रेयस तळपदे आणि अभिनेत्री काजल अग्रवाल यांनी त्यांच्या आगामी The India Story चित्रपटाच्या निमित्ताने तुकाराम मुंढे यांची भेट घेतली.
या चित्रपटात अन्नभेसळ, अन्नसुरक्षा आणि नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित महत्त्वाच्या विषयांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. जनहिताशी निगडित अशा विषयांवर समाजात अधिक जागरूकता निर्माण होणे ही सकारात्मक बाब आहे.
याआधी तुकाराम मुंढे यांच्या प्रशासकीय प्रवासावर आधारित 'तुकाराम' हे पुस्तकही प्रकाशित झाले असून, त्यांच्या कार्यशैली आणि जनहितासाठीच्या योगदानाचा त्यात आढावा घेण्यात आला आहे.
समाजहितासाठी काम करणाऱ्या व्यक्तींच्या कार्यावर चर्चा होणे आणि त्यातून प्रेरणा मिळणे, हीच खरी सकारात्मक दिशा आहे.

No comments:
Post a Comment