Thursday, July 23, 2026

कल्याण ज्वेलर्सची अभिनेत्री सारा अली खान नविन ब्रँड ॲम्बेसेडर


शंकर मराठे - मुंबई, २३ जुलै २०२६ : भारतातील सर्वात विश्वसनीय आणि आघाडीच्या दागिने कंपन्यांपैकी एक कल्याण ज्वेलर्सने बॉलीवूड अभिनेत्री सारा अली खानची आपली नवीन ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून घोषणा केली आहे. 'अंतरा' कलेक्शनसाठी एका आकर्षक मल्टी-मीडिया मोहिमेच्या माध्यमातून या भागीदारीची सुरुवात होत आहे; या कलेक्शनमध्ये ब्रँडचे उत्कृष्ट नैसर्गिक हिरे सादर करण्यात आले आहेत. ही जाहिरात म्हणजे आधुनिक स्त्रीला वाहिलेली एक सिनेमॅटिक मानवंदना आहे, जी आपल्या यशाचा आणि अनोख्या प्रवासाचा आनंद घेते; कालची स्वप्ने आजच्या वास्तवात रूपांतरित झाली आहेत या संकल्पनेवर ही जाहिरात आधारित आहे. युरोपियन शैलीतील दगडी रस्ते आणि सूर्यप्रकाशाने उजळलेले कॅफे अशा रमणीय पार्श्वभूमीवर आधारित ही फिल्म अशा एका स्त्रीचे चित्रण करते, जिने एकेकाळी पाहिलेले स्वप्न हेच तिचे सध्याचे वास्तव आहे.

महागड्या दागिन्यांच्या पारंपरिक सादरीकरण पेक्षा वेगळी वाट धरत, उत्साहाने आणि आनंदाने भरलेल्या सेलिब्रेशनचा भाव ही जाहिरात टिपते. व्हिंटेज कारमधील मजेशीर सफरी पासून ते एखाद्या गजबजलेल्या आउटडोअर बिस्ट्रोमध्ये वाढदिवसाच्या केकसोबतच्या हास्यविनोदापर्यंतचे क्षण...सारा अली खान अशा एका स्त्रीचे प्रतिनिधित्व करते जी लहान-मोठ्या अशा प्रत्येक यशाचा आनंद साजरा करते. ही मोहीम अंतरा कलेक्शनला स्त्रीच्या दैनंदिन यशाची आणि वैयक्तिक प्रगतीची एक तेजस्वी साथीदार म्हणून सादर करते. यात स्त्रीत्वाचा मुक्त आविष्कार साजरा केला जातो, जिथे नैसर्गिक हिरे एका प्रवासाचा अविभाज्य भाग बनतात आणि त्यातून अभिमान तसेच आत्मविश्वासाची भावना दिसून येते.

स्वतःच्या वेगळेपणाबद्दल आत्मविश्वास बाळगणाऱ्या, परंपरांशी जोडलेल्या आणि तरीही आधुनिक दृष्टिकोन असलेल्या भारतीय महिलांच्या पिढीचे प्रतिनिधित्व सारा अली खान करते. ही वैशिष्ट्ये प्रभावी कथाकथन आणि प्रसन्न दृश्यांच्या माध्यमातून मांडली गेली आहेत; या कलेक्शनमधील प्रत्येक दागिना हा स्वतःची ओळख व्यक्त करण्याचे एक माध्यम म्हणून कसा काम करतो, हे दाखवण्यात आले आहे. वर्तमानातील अनमोल वारसा म्हणून तयार करण्यात आलेल्या या संग्रहात आकर्षक नेकलेस, अंगठ्या, कानातले आणि ब्रेसलेट्सचा समावेश आहे. नैसर्गिक हिऱ्यांची चमक आणि दुर्मिळता यांचा गौरव करणारे हे दागिने दैनंदिन वापरासोबतच विशेष प्रसंगांच्या वेळीही व्यक्तिमत्त्वात अभिजातता आणि सौंदर्य आणण्यासाठी अत्यंत बारकाईने घडवण्यात आले आहेत.

No comments:

Post a Comment

कल्पना पटवारी की ७ गीतों की ‘छठ गीतमाला’

शंकर मराठे - मुंबई, ६ नवंबर, २०२६ : छठ महापर्व के अवसर पर लोकगायिका कल्पना पटवारी ७ छठगीतों की विशेष ‘छठ गीतमाला’ लेकर आ रही हैं। इस संगीतमय...