Saturday, November 8, 2025

तेजश्री प्रधानचे भव्य डेस्टिनेशन बीच वेडिंगचं शूटिंग

 

शंकर मराठे - मुंबई, ८ नोव्हेंबर २०२५ : सध्या मराठी टेलिव्हिजन आपल्या प्रेक्षकांना सिनेमॅटिक अनुभव देण्यात आघाडीवर आहे. टीव्हीच्या छोट्या पडद्यावर मोठ्या पडद्याचा भव्य अनुभव देणाऱ्या चॅनेल्सपैकी झी मराठी नेहमीच पुढे राहिली आहे. 

आता झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘वीण दोघातली ही तुटेना’ ने या दर्जाला आणखी उंची दिली आहे कारण या मालिकेत गोव्यातील समुद्रकिनाऱ्यावर दोन जोडप्यांच्या भव्य डेस्टिनेशन बीच वेडिंगचं चित्रीकरण करण्यात आलं आहे. मराठी टेलिव्हिजनवरील हा पहिलाच प्रयत्न असून, या नव्या उपक्रमाने मालिकेला एक वेगळं स्थान दिलं आहे.

या मालिकेतील ‘स्वानंदी’ म्हणजेच तेजश्री प्रधान हिने तिचा अनुभव सांगितला. तेजश्री म्हणाली –‘वीण दोघातली ही  तुटेना' "महाविवाह सोहळा" गोव्यात झालेल्या डेस्टिनेशन बीच वेडिंगचं शूटिंग करताना मी सगळ्यात जास्त एन्जॉय केले ते म्हणजे तिथले मासे खाऊन ! तिथल्या चित्रिकरणाची सगळ्यात आव्हानात्मक गोष्ट सांगायची झाली तर ४० - ४४ डिग्री तापमानात समुद्रकिनारी शूट करणं. इतक्या उष्ण वातावरणात वेडिंग लूक सांभाळणं, कपडे, दागिने, मेकअप यांची काळजी घेणं आणि त्या सगळ्यात भावनांवर नियंत्रण ठेवणं हे खरंच कठीण होतं. पण तरीही आम्ही सगळ्यांनी हा अनुभव मनापासून एन्जॉय केला. लोकेशन इतकं सुंदर होतं की सूर्य मावळताना हवामान थंड, वाऱ्याचं आल्हाददायक झुळूक देणारं आणि आकाशात दिसणारा सुंदर तांबडा  रंग पाहताना आमचा सगळा  थकवा गायब व्हायचा. मग आम्ही सगळे सूर्यास्ताचा मस्त आनंद घ्यायचो.

तेव्हा बघायला विसरू नका 'वीण दोघातली ही तुटेना' महाविवाह सोहळा सोमवार- शनिवार संध्याकाळी ७:३० वा. सदैव तुमच्या झी मराठीवर.

No comments:

Post a Comment

स्वामीचा "देऊळ बंद २" मध्ये दुचाकीवरून प्रवास

शंकर मराठे - मुंबई, १६ एप्रिल २०२६ : बहुप्रतिक्षित "देऊळ बंद २" च्या प्रदर्शनाची २१ मे २०२६ ही तारीख गेल्या आठवड्यात जाहीर करण्यात...