शंकर मराठे - मुंबई, ५ डिसेंबर २०२५ : तपोवनातील साधुग्रामच्या जागेवरील प्रस्तावित वृक्षतोडीला आता मराठी सिनेइंडस्ट्रीतल्या सेलिब्रिटींचाही वाढता विरोध पाहायला मिळत आहे. अनेक कलकारांनी तपोवनात आंदोलनास पाठिंबा दर्शवलाय.
आता अभिनेत्री अनिता दाते - केळकर हिनं तपोवनात जात ही वृक्षतोड म्हणजे आपला अंत असल्याचं म्हटलं. आपल्या धर्मात पर्यावरणाला, जीवसृष्टीलाही तितकंच महत्त्व आहे. तपोवनातील झाडांची कत्तल करून जर साधू संतांसाठी व्यवस्था केली तर, त्यांनाही हे सगळं पटणार नाही असं वाटतं. प्रशासनानं, सरकारनं आता यापेक्षा वेगळा विचार करायला हवा.



No comments:
Post a Comment