शंकर मराठे - मुंबई, १६ फेब्रुवारी २०२६ : लग्नाची गोष्ट जुनी झाली तरीही मन्या व मनीच्या प्रेमाचा प्रयोग आजही 'हाऊसफुल्ल' आहे!
कधी संवादांची गोडी, तर कधी वादांची मिश्कील फोडणी, पण तुम्हा प्रेक्षकांच्या सोबतीने ही 'एका लग्नाची पुढची गोष्ट' दरवेळी नवीन वाटते. पडदा उघडल्यापासून ते टाळ्यांच्या कडकडाटापर्यंत, आयुष्याचा हा प्रवास फारच रंगतदार होतो.
एका लग्नाची पुढची गोष्ट' हे प्रशांत दामले आणि कविता लाड-मेढेकर अभिनित एक लोकप्रिय मराठी विनोदी नाटक आहे, जे लग्नानंतरच्या १८-२० वर्षांनंतरच्या वैवाहिक आयुष्यातील चढ-उतार आणि 'मिडल-लाइफ क्रायसिस' वर भाष्य करते. हे नाटक 'मन्या' आणि 'मनी' या जोडप्याच्या आयुष्यातील कडू-गोड अनुभवांवर आधारित आहे

No comments:
Post a Comment