Sunday, February 22, 2026

श्रद्धा कपूरने करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे मनोभावे दर्शन घेतले


शंकर मराठे - मुंबई, २३ फेब्रुवारी २०२६  : सध्या बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री श्रद्धा कपूर तिच्या आगामी चित्रपटाच्या चित्रिकरणात प्रचंड व्यग्र आहे. 'ईठा' असे तिच्या या नवीन सिनेमाचे नाव असून, या बहुचर्चित चित्रपटाचे चित्रीकरण सध्या कोल्हापूर शहरात सुरू आहे. याच चित्रीकरणाच्या निमित्ताने कोल्हापुरात असलेल्या श्रद्धा कपूरने वेळात वेळ काढून करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे मनोभावे दर्शन घेतले. 

​मंदिरात दर्शन घेण्यासाठी आलेल्या श्रद्धा कपूरच्या अत्यंत साध्या आणि सोज्वळ रूपाने उपस्थित चाहत्यांची मने जिंकून घेतली. एवढी मोठी आणि प्रसिद्ध बॉलिवूड सेलिब्रिटी असूनसुद्धा तिने कोणताही बडेजाव न करता अत्यंत साध्या कपड्यांमध्ये मंदिरात हजेरी लावली होती. दर्शनावेळी तिने देवी अंबाबाईच्या चरणी साडी देखील अर्पण केली. आपल्या लाडक्या अभिनेत्रीला प्रत्यक्ष पाहण्यासाठी कोल्हापूरकरांनी मंदिराच्या परिसरात एकच मोठी गर्दी केली होती. त्यावेळी श्रद्धानेही अत्यंत प्रेमाने हात हलवून चाहत्यांच्या गर्दीला हसतमुखाने अभिवादन केले.


No comments:

Post a Comment

स्वामीचा "देऊळ बंद २" मध्ये दुचाकीवरून प्रवास

शंकर मराठे - मुंबई, १६ एप्रिल २०२६ : बहुप्रतिक्षित "देऊळ बंद २" च्या प्रदर्शनाची २१ मे २०२६ ही तारीख गेल्या आठवड्यात जाहीर करण्यात...