शंकर मराठे - मुंबई, २६ मार्च २०२६ : आपल्या घायाळ करणाऱ्या अदांनी व अप्रतिम नृत्याने संपूर्ण महाराष्ट्राला भुरळ घालणारी सर्वांची लाडकी 'अप्सरा' म्हणजेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आता पुन्हा एकदा एका नव्या आणि हटके अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली आहे.
सोनाली कुलकर्णी आता सालबर्डी या आगामी चित्रपटात एका नव्या नृत्याविष्कारात दिसणार आहे. या चित्रपटातील मंजुळा हे एक विशेष आयटम साँग नुकतेच सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या गाण्यात सोनाली कुलकर्णी हिचा अतिशय दिलखेचक अंदाज आणि भन्नाट डान्स पाहायला मिळत आहे. प्रत्येक वेळी आपल्या अफलातून नृत्याने चाहत्यांना थिरकायला लावणारी ही आघाडीची अभिनेत्री आता या नव्या मंजुळा गाण्यातूनही तशीच भुरळ घालत आहे. हा चित्रपट येत्या १७ एप्रिल रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार असून, तत्पूर्वीच या गाण्याने प्रेक्षकांची उत्सुकता कमालीची वाढवली आहे.

No comments:
Post a Comment